सहा चारोळ्या

माझी अबोल प्रीत
तुझ्या श्वासात दिसते
मी मात्र ईथे गुदमरतो
तु मात्र खूशाल रमते
**
प्रकाश साळवी
०७-०६-२०१७
**
स्पर्धेसाठी चारोळी
---------------
सजल्या सगळ्या नारी
कुणी नेसल्या नऊवारी
वटवृक्षाला घालती फे-या
सात जन्म साथी साठी
फिरती मात्र गरा गरा
**
प्रकाश साळवी
०८-०६-२०१७
**
गौरकाय कांती तुझी
हळदीने बहरली
शकुनाच्या मेहेंदिने
नाजूक काया थरथरली
**
स्पर्धेसाठी चारोळी
_________________
   **** हळद ****
हळदीने झाली पिवळी काया
जशी भासते जणू मोहमाया
घे उंच नभाला कवटाळून
आलिस ईंद्राची अप्सरा
जीवन माझे फुलवाया
**
प्रकाश साळवी
०८-०६-२०१७
**
वंदेमातरम् म्हणता म्हणता
दिला त्यांनी सुखाने प्राण
त्या देशाचा मी पाईक
त्याचे नांव हिंदुस्थान
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२९-०७-२०१७                                 

ज्याला नाही म्हणायचे वंदेमातरम्
तो आहे अधमाहून अधम
जो खातो या देशाचे अन्न
त्याला म्हणावेच लागेल वंदेमातरम्
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२९-०७-२०१७

******

Comments

Popular posts from this blog

मी माणूस म्हणून...

*चारोळी :

काही चारोळ्या