राधा, कृष्ण , मीरा चारोळ्या
राधा
-----
राधा प्रेमात
बुडाली
त्या मोहक
कान्हाच्या
ध्यानी मनी वसे
तिच्या
ध्यास फक्त कान्हाचा
**
क्रिष्णा
------
क्रिष्णा नको अडवू
वाट
जावू दे
ना घरी
सासु माझी
रागावते
दिसता रित्या घागरी
**
मीरा
------
हरी रे
मी तुझीच मीरा
दिन रात
तुझाच धावा
दर्शन दे रे
आता तरी
मिळेल जीवा विसावा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१४-०८-२०१७
**
Comments
Post a Comment