*चारोळी :

स्वप्ने उराशी बाळगून
खुशाल जगावे माणसाने
ताठ मानेनं खुशाल डोलावं
शेतातील कणसाने
**
प्रकाश साळवी

२४/०३/२०१७

*चारोळी :"सैनिकांचे जीवन"*
देऊन प्राणांची आहुती
लढतो देश रक्षणासाठी
पुन्हा पुन्हा जन्मा यावे
या " भारत भू " च्या पोटी

श्री. प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०९१५८२ ५६०५४

वसंतातही मजला
बहरता आले
प्रेमात तुझ्या मज
फसवता ना आले
***
मनांत लहरी उठती प्रेमाच्या
काही तुझ्या काही माझ्या
धुंडाळलं सारं रान प्रीतिचं
सापडल्या जखमा उरीच्या
**
गंधाळलेला वारा स्पर्श
तुझा घेऊन आला
ईतक्या दुरुनही मनाने
संवाद मनाचा मनाशी साधला
**
प्रकाश साळवी
०६/०४/२०१७
**
तु मला हवी होतिस म्हणून,
कवितेत गुंफिले तुला
आता कशी रोज भेटतेस
माझ्या कवितेतुन मला
**
प्रकाश साळवी
११/०४/२०१७
**
तुझीं प्रतिमा पाहुन
भूल पडली मनाला
काय सांगू कसे सांगू
तुझ्यात जीव रंगला
**
प्रकाश साळवी
११/०४/२०१७
**
तुझ्या चेहऱ्याने मी घायाळ होतो
नसे मजपासी दमडी मी दयाळ होतो
**
(दयाळ=दयाळू)
**
प्रकाश साळवी
१२/०४/२०१७
**
तुला शोधताना सखये
दिशा साऱ्या विसरुन गेल्या
हृदय शोधताना मला
तुझ्या आठवनी सताऊन गेल्या
**
प्रकाश साळवी
१२/०४/२०१७
**

Comments

Popular posts from this blog

मी माणूस म्हणून...

काही चारोळ्या